हिंगणघाट: जंगली जनावरांपासून शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी, मनसेचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
हिंगणघाट:जंगली जनावरांपासून शेतपिक पेरणी पासुन तर कापणीपर्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान केले जाते यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो आहे.तरी याकडे सरकारने लक्ष देऊन शेतकऱ्याचे होणारे नुकसान रोखण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जयंत कातरकर यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी आकाष अवतरे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. जर का उपाययोजना केली नाही तर शेतकऱ्यांना घेऊन मनसे स्टाईलने आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे.