हिंगणघाट: कलोडे सभागृहासमोरील झोपडपट्टी अतिक्रमण उठवून दुसरीकडे स्थायी पट्टे द्या, नागरिकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
संत तुकडोजी वॉर्डातील कलोडे सभागृह समोरील झोपडपट्टी अतिक्रमण उठवून त्यांना दुसरी कडे स्थायी पट्टे द्या या प्रमुख मागणीसाठी संत तुकडोजी वॉर्डातील नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.संत तुकडोजी वॉर्ड येथील कलोडे सभागृह समोरील शासकीय जागेवरील अतिक्रमण हे संत तुकडोजी वॉर्डातील रहिवाश्यांना अतिशय त्रासदायक ठरत आहे. येथील काही दुकानांमध्ये व झोपडपट्टीमध्ये दारू व इतर नशिले पदार्थ विकण्यात येते. तसेच या रस्त्यावर मुली व महिलांची नेहमीच छेड काढल्या जाते. असे निवेदन नमूद करण्यात आले.