पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे 'Operation TAPE for Safe' अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग व इतर प्रमुख महामार्गांवर होणारे अपघात रोखण्यासाठी प्रभारी पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीत जिल्ह्यातील महामार्गांवरील अपघातांची कारणे, अपघातप्रवण ठिकाणे तसेच अपघात रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संकेत गोसावी, वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री. राजेंद्र कुलकर्णी उपस्थित होते.
बैठकीत निश्चित करण्यात आलेल्या उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्रभारी पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदेSunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police HeadquarterIGP Konkan Range #RoadSafety #ratnagiri #RatnagiriPolice
15 views | Ratnagiri, Maharashtra | Nov 14, 2026