रत्नागिरी पोलीस दलाच्या ‘Operation TAPE for Safe’ अंतर्गत जिल्ह्यातील रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी प्रभारी पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यानंतर राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
यावेळी उपविभागीय अधिकारी श्री. संकेत गोसावी, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महामार्ग पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने अपघातप्रवण ठिकाणी आवश्यक उपाययोजना करण्यासह स्पीड ब्रेकर बसविण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.
CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range Nitin Bagate IPS #roadsafety #ratnagiri #ratnagiripolice
15 views | Ratnagiri, Maharashtra | Nov 14, 2026