जळगाव: कॉलेजला जात असल्याचे सांगून रामेश्वर कॉलनीतून झाली बेपत्ता; एमआयडीसी पोलीसात बेपत्ता झाल्याची नोंद
जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात राहणारी २१ वर्षीय तरूणी ही कॉलेजला जात असल्याचे सांगून बुधवारी २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजेपासून बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी शुक्रवारी २८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.