शहादा: मेमन कॉलनीत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून ९ लाख रोख व अडीच तोडे सोने चोरून नेले
शहादा शहरातील मेमन कॉलनी अज्ञात यांनी घरफोडी करून सुमारे नऊ लाख रुपयांची रोकड व अडीच तोळे सोने भरदिवसा चोरी करून नेले आहे. याप्रकरणी शहादा शहरात खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की मेमन कॉलनीतील रहिवासी राजू मेमन हे आपल्या नातेवाईकांच्या येथे कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त गेले असता अज्ञात चोट्याने त्याची संधी साधत घरातून रोकड सोने चांदी चोरून नेले आहे.