शहादा: शिवजयंतीनिमित्त दोंडाईचा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले अभिवादन
शहादा शहरातील दोंडाईचा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला शिवजयंतीनिमित्त सोमवारी सकाळी अभिवादन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून सामूहिक अभिवादन केले. याप्रसंगी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.