शहादा: कळंबू येथे शेत मजुरीच्या आगाऊ पैशाच्या वादातून पती-पत्नीवर चाकूने हल्ला, शहादा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल
शहादा तालुक्यातील कळंबू येथे शेत मजुरीसाठी आगाऊ दिलेले पैसे परत मागितले असता, ती रक्कम १० दिवसांनी दुसरीकडे काम करून परत करेन असे सांगितले. त्यानंतर एकाने राग आल्याने मंगेश सोनवणे आणि रुखमाबाई सोनवणे यांच्यावर चाकूने वार करून त्यांना जखमी केल्याची घटना १५ फेब्रुवारीला सकाळी घडली. याप्रकरणी संशयित आप्पा मधुकर बोरसे याच्यावर शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.