नेर: शिवीगाळ करताना हटकले असता एकास मारहाण,बाळेगाव येथील घटना
Ner, Yavatmal | Nov 5, 2025 फिर्यादी धनराज जनार्दन गेडाम यांच्या तक्रारीनुसार 3 नोव्हेंबर ला आरोपी तुळशीराम नाईक हे फिर्यादीच्या घरासमोर येऊन शिवीगाळ करत असल्याने फिर्यादीने आरोपीस हटकले असता आरोपीने फिर्यादी सोबत वाद करून मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.या प्रकरणी चार नोव्हेंबरला रात्री अंदाजे आठ वाजताच्या सुमारास नेर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी तुळशीराम नाईक सह तिघाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.