नेर: विस्तवात जगणे काय असते मला विचारून घ्याहो-नेर येथे धम्म परिषदेत कवी विनय मिरासे यांचा मर्मस्पर्शी प्रश्न
Ner, Yavatmal | Jan 15, 2026 कवी हा भवतालाच्या घटनांचा सजग पहारेकरी तर कविता हे विचारांचा जागर करणारे शब्दमाध्यम.चळवळीतील कवींनी अखंडपणे जागृतीच्या मशाली तेवत ठेवल्या आहेत.कधी विद्रोही शब्दपथाचे तर कधी 'युध्द नको मज बुध्द हवा 'अशा राजमार्गाचे कवी पथिक राहिलेले आहेत.या भूमिकेचे धम्मक्रांती कविसंमेलन नेर येथे पार पडले.अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी विनय मिरासे.....