हिंगणा: ‘झेन-झी’ आणि बदलते जग हा चिंतनाचा विषय: डॉ. भूषणकुमार उपाध्याय
Hingna, Nagpur | Aug 18, 2026 18 ऑगस्टला दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार युवालेखक श्रावण अल्लेवार यांच्या ‘इट पेजेस नो टू मच’ या कादंबरीचा प्रकाशन सोहळा डिगडोह येथील बंग सभागृहात उत्साहात पार पडला. सेवानिवृत्त पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. आजची ‘झेन-झी’ पिढी प्रश्न विचारणारी असून, तंत्रज्ञान, सोशल मीडिया आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे नव्या संस्कृतीचा वेगाने उदय होत आहे. संस्कृतीचे स्वरूप बदलत असून नव्या पिढीला समजून घेणे गरजेचे असल्याचे मत डॉ. उपाध्याय य