जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहाराच्या बहाण्याने एका 24 वर्षीय विवाहित महिलेला हॉटेलमध्ये बोलावण्यात आलं. तिथं त्या महिलेला शीतपेय
पिण्यासाठी देण्यात आलं. मात्र, त्या शीतपेयात दोन आरोपींनी आधीच गुंगीचं औषध मिसळलं होतं. शीतपेय पिल्यानंतर महिला बेशुद्ध झाली. त्यांनतर आरोपींनी त्या महिलेवर आळीपाळीनं बलात्कार केला. एवढंच नाही तर आरोपींनी हा संपूर्ण किळसवाणा प्रकाराचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. आरोपींनी त्या महिलेला ब्लॅकमेल करत तीन लाख रुपये देखील वसूल केलेत. हे आरोपी एवढ्यावरच थांबले नाही तर महिलाचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्या पीडित महिलेनं पोलीस ठाणे गाठले आणि सर्व हकीकत पोलिसांना सांगितली. हा संपूर्ण प्रकार नागपूर शहरातील सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये घडलेला आहे. पीडित महिला अनुसूचित जाती समाजातीलअसल्याने प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे.
यातील मुख्य आरोपी पीडित महिलेचा वर्गमित्र असल्याची माहिती समोर आली आहे. सोनेगाव पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींना अटक केलेली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अय्याज ताज मदारे, आमीन शेख यांचा समावेश आहे.
.
.
.
#NagpurCrime #NagpurPolice #JusticeForVictim #JusticeForVictim
#ConversionPressure #AtrocitiesAct
#WomenSafety #Viralvideo
Haveli, Pune | Jun 16, 2026