भिवंडीत धीरेंद्र शास्त्रींच्या स्वागत फलकांवर काळे फासले; पोलिसांच्या उपस्थितीत फलक हटवले...
.
.
भिवंडी बायपास मार्गावरील दिवे परिसरात आयोजित एका कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर भिवंडीत मोठे राजकीय आणि सामाजिक नाट्य पाहायला मिळाले. बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनर्सवरून धीरेंद्र शास्त्री समर्थक आणि शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते.
नागपूर येथील एका कार्यक्रमात धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याचा राग कार्यकर्त्यांमध्ये होता. भिवंडीतील या स्वागत फलकांवर छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र वापरण्यात आल्याने शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आक्षेप घेतला आणि धीरेंद्र शास्त्री यांच्या फोटोला काळे फासून निषेध नोंदवला.
या घटनेनंतर धीरेंद्र शास्त्री समर्थक आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला आणि परिसरात तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत दोन्ही बाजूंना शांत केले आणि पोलिसांच्या उपस्थितीतच रस्त्यालगतचे सर्व स्वागत फलक हटविण्यात आले आहेत.
.
.
.
#Bhiwandi #DhirendraShastri #BageshwarDham #ShetkariSanghatana #ThaneNews #Controversy #BreakingNewsMarathi #MaharashtraPolitics