"इंडोनेशियातील प्री-वेडिंग रद्द करण्यामागे सियाचा डाव?; केतनच्या वडिलांचा खळबळजनक दावा"
.
.
पुण्यातील हायप्रोफाईल केतन अग्रवाल खून प्रकरणाचा तपास लोणावळा पोलीस करत असतानाच, आता केतनच्या वडिलांनी केलेल्या एका दाव्याने खळबळ उडवून दिली आहे. १७ कोटींच्या शाही लग्नाची तयारी सुरू असताना, अचानक इंडोनेशिया येथे होणारे प्री-वेडिंग शूट रद्द करण्यात आले होते. आता यामागे मुख्य आरोपी सिया गोयल हिचाच मोठा डाव होता, असा थेट आरोप केतनच्या वडिलांनी केला आहे.
केतनच्या वडिलांच्या मते, सियाने केवळ केतनला फसवले नाही, तर त्याचा खून करण्यासाठी आधीपासूनच प्लॅनिंग सुरू केले होते आणि याच कटाचा भाग म्हणून तिने इंडोनेशियाचे प्री-वेडिंग शूट कॅन्सल करायला लावले होते. लोहगडावरून पाय घसरून पडल्याचा कांगावा करणाऱ्या सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी सध्या पोलिसांच्या कोठडीत आहेत. वडिलांच्या या नव्या दाव्यानंतर पोलीस आता या दिशेने तपास करत आहेत का?
.
.
.
#KetanAgarwalCase #SiyaGoyal #KetanAgarwalFather #LonavalaPolice #PreWeddingCancel #PuneCrime #BreakingNewsMarathi #JusticeForKetan #puneprimenews
Haveli, Pune | Jun 23, 2026