अवैध धंद्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई!
गडचिरोली जिल्ह्यात अवैध व्यवसायांविरोधात कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखेने आरमोरी, चामोर्शी आणि कोरची पोलीस स्टेशन हद्दीत तीन स्वतंत्र कारवाया केल्या.
🔹 आरमोरी: अवैध गोवंश वाहतुकीवर कारवाई करत 25 गोवंशीय जनावरे व आयशर वाहनासह ₹15.18 लाखांचा मुद्देमाल जप्त करून 02 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल.
🔹 चामोर्शी: अवैध देशी दारू वाहतुकीवर कारवाई करत दारू, चारचाकी वाहन व मोबाईलसह ₹9.18 लाखांचा मुद्देमाल जप्त; संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल.
🔹 कोरची: अवैध जुगारावर छापा टाकून ₹5,115 रोख व इतर साहित्य जप्त करत गुन्हा नोंद.
पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध गोवंश वाहतूक, दारू, जुगार व इतर अवैध व्यवसायांविरोधात कठोर कारवाई सातत्याने सुरू आहे.
अवैध व्यवसायांना आळा… कायद्याची कठोर अंमलबजावणी!
#GadchiroliPolice #LocalCrimeBranch #PoliceAction #Armori #Chamorshi Korchi
48 views | Gadchiroli, Maharashtra | Oct 7, 2026