नागरिकांच्या तक्रारींना थेट प्रतिसाद… देसाईगंज येथे ‘तक्रार निवारण दिन’!
पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या उपस्थितीत पोलीस स्टेशन देसाईगंज येथे तक्रार निवारण दिन व सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी 100 हून अधिक नागरिक उपस्थित होते आणि प्राप्त तक्रारींपैकी 06 तक्रारींचा बैठकीदरम्यान कायदेशीर निपटारा करण्यात आला.
कार्यक्रमात नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. तसेच ‘सायबर जनजागृती महिना’ अंतर्गत ऑनलाइन आर्थिक फसवणूक, बनावट लिंक, OTP-PIN फसवणूक, बनावट गुंतवणूक योजना आदी सायबर धोक्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
संवादातून विश्वास… तक्रारींच्या निवारणातून नागरिकांना दिलासा!
गडचिरोली पोलीस — सदैव आपल्या सोबत.
#GadchiroliPolice #DesaiganjPolice #GrievanceRedressal #CyberAwareness #CyberSafety CommunityPolicing
46 views | Gadchiroli, Maharashtra | Oct 13, 2026