भडगांव तालुक्यातील ग्रामीण भागातील एका गावात समाजाला हादरवून टाकणारी घटना समोर आली. एका २२ वर्षीय तरुणाने आपल्या नात्याने चुलत बहिण असलेल्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गेल्या दीड वर्षापासून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या अत्याचारातून संबंधित अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पीडित मुलीच्या आईने भडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.