भडगाव: कोठली येथे महादेव यात्रोत्सव, कुसत्या, महाप्रसादाचेही आयोजन, ग्रामस्थ आयोजकांनी दिली माहिती,
भडगाव तालुक्यातील कोठली येथील लक्ष्मी नगर भराडी वस्ती येथे वस्तीवासीयांनी गेल्या वर्षी महादेवाचे मंदिर बांधून प्राणप्रतिष्ठा व अभिषेक पूजा करून यात्रा भरवली होती. तशीच ह्या वर्षी देखील यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सोबतच दिनांक 19 जानेवारी 2026 सोमवार रोजी कुस्त्यांचे देखील आयोजन केले गेले आहे तरी तालुक्यातील कुस्ती गारपटूंनी उपस्थित राहावे असे आव्हान करण्यात आले आहे तसेच दिनांक 20 जानेवारी 2026 मंगळवार रोजी सकाळी महादेवाची अभिषेक पूजा, महाप्रसाद चा कार्यक्रम देखील आयोजित केलाय