धर्मवीर आनंद दिघेंच्या २५ व्या स्मृतिदिनी शक्तिस्थळावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंकडून विनम्र अभिवादन ,खासदार नरेश म्हस्के यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज धर्मवीर आनंद दिघे यांच्या २५ वा स्मृतिदिन निमित्ताने शिवसैनिकांसह ठाण्यातील शक्तिस्थळ येथे भेट देऊन आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी खासदार नरेश म्हस्के, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, प्रकाश पाटील, नगरसेवक रमाकांत मढवी, युवासेना जिल्हाध्यक्ष जितेन पाटील यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Kalyan, Thane | Aug 26, 2026