संकट मोठं असलं तरी जिद्द अन् एकजूट त्याहून मोठी! बारूळ येथे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची दिवाळी फराळासोबत घोंगडी बैठक
धाराशिव : जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असताना शेतकरी बांधवांना धीर देण्यासाठी आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी बारूळ येथे दिवाळी फराळासोबत घोंगडी बैठकीचे आयोजन केले. या बैठकीत शेतकरी, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थांशी त्यांनी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि प्रश्न जाणून घेतले.
दिवाळीच्या फराळाचा आस्वाद घेत पार पडलेल्या या बैठकीत ग्रामीण भागातील सध्याची परिस्थिती, दुष्काळाची तीव्रता, शेतीसमोरील संकटे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. हा संवाद केवळ दिवाळीच्या सणापुरता मर्यादित नसून संकटाच्या काळात शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा विश्वास देणारा ठरला.
यावेळी बोलताना आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की, दुष्काळावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महायुती सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यात अनेक ठोस प्रयत्न सुरू आहेत. उजनीतून धाराशिव जिल्ह्यासाठी एक टीएमसी पाणी उपलब्ध होत आहे. तसेच गावागावांत नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले असून चारा लागवड आणि गाळपेर क्षेत्रातील शेतीला चालना देण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.
सध्याच्या संकटाच्या काळात शेतकरी बांधवांनी खचून जाऊ नये. त्यांच्या सुख-दुःखात आणि संघर्षात आपण खंबीरपणे सोबत आहोत. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, असा विश्वासही आमदार पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
या घोंगडी बैठकीमुळे शेतकरी आणि लोकप्रतिनिधी यांच्यात थेट संवाद घडून आला. दिवाळीच्या आनंदासोबतच ग्रामीण भागातील प्रश्नांना वाचा फोडण्याची आणि संकटाच्या काळात एकजुटीने उभे राहण्याची भावना या उपक्रमातून व्यक्त झाली.
यावेळी सिद्धेश्वर कोरे, विक्रम देशमुख, संतोष बोबडे, दयानंद शिंदे, वैभव मरडे, किसन देडे, भिवाजी इंगोले, प्रभाकर मुळे, अनिल बंडगर, प्रशांत लोमटे, बाबुराव ठोंबरे, शहाजी सुपनार, नबीलाल शेख, संजय ठोंबरे, सुधीर सुपनार, पंकज धनवडे, भास्कर सगट, रतन मुदगुडे, बाबुराव यावलकर, बाबुराव टोम्पे, अशोक देवगुंडे, पद्मराज गडदे, दामाजी राठोड, कल्याण बिराजदार आदी उपस्थित होते.
#OsmanabadNews #उस्मानाबादन्यूज #धाराशिवन्यूज #धाराशिव #उस्मानाबाद #अंतरसंवादन्यूज #RanajagjitsinhaPatil #Barul #घोंगडीबैठक #दिवाळीफराळ #शेतकरीएकजूट #दुष्काळमुक्तधाराशिव #शेतकरीहित #जनसेवा
Dharashiv, Dharavshiv | Nov 10, 2026