Public App Logo
Profile Picture

Osmanabad News

@osmanabadnews.in
4877Followers
7Following
🪔✨ सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! ✨🪔
दिव्यांच्या प्रकाशाने आपले आयुष्य उजळून निघो. ही दीपावली आपल्या सर्वांच्या जीवनात आनंद, आरोग्य, समृद्धी आणि सुख-शांती घेऊन येवो, हीच मनापासून सदिच्छा!
🎆 आपल्या कुटुंबासह, मित्रपरिवारासह हा सण आनंदाने आणि सुरक्षितपणे साजरा करा.
शुभेच्छुक
संपादक – सलीम पठाण
उस्मानाबाद न्यूज | साप्ताहिक अंतरसंवाद न्यूज
🌐 https://osmanabadnews.in
🌐 https://antarsanwadnews.com
<nis:link nis:type=tag nis:id=दीपावली nis:value=दीपावली nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=दिवाळी nis:value=दिवाळी nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=happydiwali nis:value=HappyDiwali nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=दीपावलीच्या_हार्दिक_शुभेच्छा nis:value=दीपावलीच्या_हार्दिक_शुभेच्छा nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=शुभदीपावली nis:value=शुभदीपावली nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=दिवाळी2026 nis:value=दिवाळी2026 nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=diwali2026 nis:value=Diwali2026 nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=उस्मानाबाद nis:value=उस्मानाबाद nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=उस्मानाबादन्यूज nis:value=उस्मानाबादन्यूज nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=साप्ताहिकअंतरसंवाद nis:value=साप्ताहिकअंतरसंवाद nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=अंतरसंवादन्यूज nis:value=अंतरसंवादन्यूज nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=osmanabadnews nis:value=OsmanabadNews nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=antarsanwadnews nis:value=AntarsanwadNews nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=महाराष्ट्र nis:value=महाराष्ट्र nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=मराठी nis:value=मराठी nis:enabled=true nis:link/>
धाराशिव नगरपालिकेतील अग्निशामक दलाच्या प्रकरणावर , नगरसेवक राहुल काकडे यांची प्रतिक्रिया चौकशी करून कारवाई होणार!
धाराशिव - येडशी येथील घडलेल्या दुर्घटनेवर आमदार कैलास पाटील यांची प्रतिक्रिया
तुळजापूर दुकानाला भीषण आगीमुळे परिसरात खळबळ, अग्निशमन दलाची धावपळ!
वंचित बहुजन आघाडीने साजरी केली ‘काळी दिवाळी’; चटणी-भाकर खाऊन शासनाचा निषेध

(दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर व कष्टकरी जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन)

धाराशिव (दि. ८ नोव्हेंबर) : राज्यातील अनियमित पावसामुळे निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती, शेतकऱ्यांचे नुकसान, शेतमजुरांच्या हाताला काम नसणे आणि ग्रामीण भागातील कष्टकरी जनतेची आर्थिक ओढाताण या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘काळी दिवाळी’ आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष धनंजय सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चटणी-भाकर खाऊन शासनाच्या धोरणांचा निषेध नोंदविला. यावर्षी पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांच्या हातात अपेक्षित पीक आले नाही. अनेक ठिकाणी पिके करपून गेली असून जनावरांच्या चाऱ्याचा तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेतमजुरांना रोजगार उपलब्ध होत नसल्याने ग्रामीण भागातील कष्टकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच महागाई, बेरोजगारी आणि वाढत्या आर्थिक अडचणींमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन अधिकच कठीण झाले आहे.

दुष्काळ हे केवळ शेतकऱ्यांपुरते मर्यादित संकट नसून त्याचे परिणाम संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होत आहेत. भूमिहीन नागरिक, शेतमजूर, रोजंदारी कामगार, परित्यक्ता महिला, पशुपालक, दूध उत्पादक, लघुउद्योजक आणि बेरोजगार युवक यांनाही या परिस्थितीचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे शासनाने दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना आखताना केवळ जमीनधारक शेतकऱ्यांचा विचार न करता सर्व बाधित घटकांचा समावेश करावा. प्रत्येक घटकासाठी स्वतंत्र मदत व पुनर्वसन योजना जाहीर करून पात्र लाभार्थ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

या मागण्यांचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी विद्याचरण कवडकर यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आले. पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शासनाचा जीआर नावालाच का? , धाराशिव जिल्ह्यातील अनेक अधिकारी विनापरवाना मुख्यालय सोडून गायब!
🪔✨ दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!✨🪔

दिव्यांचा हा मंगल उत्सव आपल्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद घेऊन येवो. अंधारावर प्रकाशाचा विजय होवो आणि आपल्या सर्वांच्या जीवनात नवी आशा, नवा उत्साह निर्माण होवो, हीच सदिच्छा!

🙏 शुभेच्छुक : रामजीवन बोंदर
प्रदेश उपाध्यक्ष, शिवसेना शेतकरी परिषद

<nis:link nis:type=tag nis:id=दीपावली nis:value=दीपावली nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=दिवाळी nis:value=दिवाळी nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=शुभदीपावली nis:value=शुभदीपावली nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=दिवाळीच्या_हार्दिक_शुभेच्छा nis:value=दिवाळीच्या_हार्दिक_शुभेच्छा nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=धाराशिव nis:value=धाराशिव nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=शिवसेना nis:value=शिवसेना nis:enabled=true nis:link/>
🪔 दीपावलीच्या मंगलमय पर्वानिमित्त सर्वांना लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺

आई लक्ष्मीच्या कृपेने प्रत्येकाच्या घरात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो. प्रत्येकाच्या आयुष्यात यशाची नवी पहाट उजाडो, सर्वांच्या मनोकामना पूर्ण होवोत आणि जीवनात सुख-समाधानाचा प्रकाश सदैव राहो, हीच मनःपूर्वक प्रार्थना! 🙏

शुभेच्छुक - नितीन आबा पाटील
🪔🚩 बलिप्रतिपदा व दीपावली पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩🪔

दिव्यांच्या प्रकाशाने प्रत्येकाचे जीवन आनंदमय होवो. सुख, समृद्धी, आरोग्य आणि भरभराट लाभो, हीच मनःपूर्वक सदिच्छा!

शुभेच्छुक : मा. श्री. अमोल जाधव ,मा.तालुकाध्यक्ष, तुळजापूर शिवसेना (एकनाथ शिंदे)

<nis:link nis:type=tag nis:id=अमोलजाधव nis:value=अमोलजाधव nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=बलिप्रतिपदा nis:value=बलिप्रतिपदा nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=दीपावलीपाडवा nis:value=दीपावलीपाडवा nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=शिवसेना nis:value=शिवसेना nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=तुळजापूर nis:value=तुळजापूर nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=धाराशिव nis:value=धाराशिव nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=उस्मानाबादन्यूज nis:value=उस्मानाबादन्यूज nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=धाराशिवन्यूज nis:value=धाराशिवन्यूज nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=osmanabadnews nis:value=OsmanabadNews nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=antarsanwadnews nis:value=AntarsanwadNews nis:enabled=true nis:link/>
शुभ दीपावली ! शुभ दीपावली ! शुभ दीपावली !

*जनता सहकारी बँक लिमिटेड, धाराशिव.
*(मल्टी-स्टेट बँक)
*मुख्य कार्यालय: 24/28-30, 38, सोलापूर रोड, धाराशिव-413501.
*फोन नंबर (02472) 227972, 83, 84 फॅक्स (02472) 227984

*Web site: http://www.jsbdharashiv.bank.in Email: headoffice@jsbdharashiv.bank.in*
*RBI Lic. No. http://UBD.MH.464 P. MSCS Reg. No. MSCS/CR/106/2000.*
*GST NO :- (MH) 27AAAAO0079L1ZE (KA) 29AAAAO0079L1ZA*

*आमच्या सर्व खातेदार, सभासद, हितचिंतक व ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा...!*

*बँकेचे ठळक वैशिष्ट्ये -*
- महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात बँकेच्या एकूण 34 शाखेसह कार्यरत असलेली मराठवाड्यातील अग्रगण्य सहकारी बँक.
- सर्व शाखा अद्ययावत कोअर बँकिंग प्रणालीद्वारे कार्यान्वीत.
- सर्व शाखेत लॉकरची सुविधा उपलब्ध.
- सर्व शाखेत RTGS, NEFT, IMPS, SMS & POS सुविधा उपलब्ध.
- मुख्य शाखा धाराशिव येथे ATM सेवा उपलब्ध.
- UPI तसेच मोबाईल बँकिंग सेवा उपलब्ध.
- CTS Clearing, NACH सेवा उपलब्ध.
- Rupay Card द्वारे देशातील कोणत्याही बँकेच्या ATM मधून पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध.
- सर्व शाखेमध्ये QR Code सुविधा कार्यान्वीत.

*श्री. व्ही.एस. नागदे*
*अध्यक्ष*
*व सर्व संचालक मंडळ, जनता सहकारी बँक लिमिटेड, धाराशिव.*
शुभ दिपावली !
प्रभाग क्रमांक 20 मधील सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा...!
वर्ष 2 रे
लोकनायक राणादादा..!

शुभेच्छुक : विलास (बापु) लोंढे
पाणीपुरवठा सभापती तथा नगरसेवक, नगर परिषद, धाराशिव
✨ दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ✨

घराघरात दिव्यांचा प्रकाश आणि अंतःकरणात श्रद्धेचा तेजोदीप प्रज्वलित होवो!

आपणांस व आपल्या परिवारास दीपावली व लक्ष्मीपूजनाच्या मंगलमय शुभेच्छा!

शुभेच्छुक -
पै. विकी चव्हाण
शिवसेना गटनेते, धाराशिव जिल्हा परिषद

<nis:link nis:type=tag nis:id=diwali2025 nis:value=Diwali2025 nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=deepawali nis:value=Deepawali nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=lakshmipujan nis:value=LakshmiPujan nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=shivsena nis:value=Shivsena nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=dharashiv nis:value=Dharashiv nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=vickychavan nis:value=VickyChavan nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=धारााशिव nis:value=धारााशिव nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=दीपावली nis:value=दीपावली nis:enabled=true nis:link/>
प्रभाग क्रमांक २० मध्ये विलास बापू लोंढे यांच्यातर्फे भव्य दिवाळी फराळ वाटप; नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या हस्ते शुभारंभ

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या आवाहनाला विलास बापू लोंढे यांचा प्रतिसाद

धाराशिव : दिवाळीचा आनंद सर्वसामान्य आणि गरजू नागरिकांसोबत साजरा करण्याच्या उद्देशाने भाजपा नगरसेवक तथा पाणीपुरवठा सभापती विलास (बापू) लोंढे यांच्या वतीने प्रभाग क्रमांक २० सह इतर प्रभागांतील नागरिकांसाठी भव्य दिवाळी फराळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यंदा गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट प्रमाणात फराळ वाटपाचे नियोजन करून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली.

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांना आवाहन केले होते की, वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ, हारतुरे किंवा बॅनरबाजीवर खर्च न करता त्याऐवजी गोरगरीब, गरजू आणि दुष्काळग्रस्त नागरिकांना मदतीचा हात द्यावा. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत नगरसेवक विलास बापू लोंढे यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी फराळ वाटपाचा उपक्रम राबविला. मात्र, यंदा केवळ प्रभाग क्रमांक २० पुरते मर्यादित न राहता इतर प्रभागांतील नागरिकांनाही या उपक्रमाचा लाभ मिळावा, यासाठी गतवर्षीपेक्षा दुप्पट प्रमाणात फराळ वाटपाचे नियोजन केले.

या कार्यक्रमाचा शुभारंभ भाजपा नगराध्यक्षा नेहा ताई काकडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी नगरसेवक विलास (बापू) लोंढे आणि त्यांच्या पत्नी सौ. ज्योती ताई लोंढे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला प्रभागातील तसेच इतर भागांतील मोठ्या संख्येने महिला, माता-भगिनी आणि नागरिक उपस्थित होते. फराळ वाटपावेळी नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

विलास बापू लोंढे हे सातत्याने सामाजिक कार्यात सक्रिय असून गोरगरीब आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीसाठी पुढाकार घेत असतात. नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी प्रभागातील विविध प्रश्नांवर काम केले. त्यानंतर पाणीपुरवठा सभापती पदाची जबाबदारी मिळाल्याने त्यांच्या कामाचा व्याप आणि जबाबदारी वाढली आहे. नागरिकांच्या मूलभूत सुविधांसोबतच सामाजिक उपक्रमांनाही त्यांनी प्राधान्य दिले आहे.

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलेल्या आवाहनाचा सामाजिक उपक्रमातून प्रतिसाद देत, दिवाळीचा आनंद अधिकाधिक गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न विलास बापू लोंढे यांनी केला. त्यामुळे यंदाचे फराळ वाटप विशेष चर्चेचा विषय ठरले. यावेळी मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी , नगरसेवक व प्रभागातील नागरिक उपस्थित होते.

<nis:link nis:type=tag nis:id=osmanabadnews nis:value=OsmanabadNews nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=उस्मानाबादन्यूज nis:value=उस्मानाबादन्यूज nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=धाराशिवन्यूज nis:value=धाराशिवन्यूज nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=अंतरसंवादन्यूज nis:value=अंतरसंवादन्यूज nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=धाराशिव nis:value=धाराशिव nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=विलासलोंढे nis:value=विलासलोंढे nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=राणाजगजितसिंहपाटील nis:value=राणाजगजितसिंहपाटील nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=नेहाकाकडे nis:value=नेहाकाकडे nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=दिवाळीफराळ nis:value=दिवाळीफराळ nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=सामाजिकउपक्रम nis:value=सामाजिकउपक्रम nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=dharashivnews nis:value=DharashivNews nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=diwalicelebration nis:value=DiwaliCelebration nis:enabled=true nis:link/>
🪔🪷 दीपावलीच्या पावन पर्वानिमित्त सर्व नागरिकांना सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद लाभो. दीपोत्सवाच्या प्रकाशाने प्रत्येकाचे जीवन उजळून निघो, हीच मनःपूर्वक सदिच्छा!

शुभेच्छुक : सचिन शिवाजीराव तावडे जिल्हाध्यक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, धाराशिव.

💐 सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! 💐

<nis:link nis:type=tag nis:id=सचिनतावडे nis:value=सचिनतावडे nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=राष्ट्रवादीकाँग्रेस nis:value=राष्ट्रवादीकाँग्रेस nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=दीपावली nis:value=दीपावली nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=दिवाळी nis:value=दिवाळी nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=दिवाळीच्या_शुभेच्छा nis:value=दिवाळीच्या_शुभेच्छा nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=धाराशिव nis:value=धाराशिव nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=उस्मानाबाद nis:value=उस्मानाबाद nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=धाराशिवन्यूज nis:value=धाराशिवन्यूज nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=उस्मानाबादन्यूज nis:value=उस्मानाबादन्यूज nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=osmanabadnews nis:value=OsmanabadNews nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=dharashivnews nis:value=DharashivNews nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=antarsanwadnews nis:value=AntarsanwadNews nis:enabled=true nis:link/>
येडशीतील अग्नितांडवाने सहा जणांचा मृत्यू; आमदार कैलास पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत केली पाहणी

धाराशिव : धाराशिव तालुक्यातील येडशी येथे मध्यरात्री घडलेली आगीची भीषण दुर्घटना अत्यंत हृदयद्रावक असून, या अग्नितांडवात एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. करंडे गिफ्ट सेंटर व किराणा दुकानाला लागलेल्या आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण करीत शेजारील घरालाही आपल्या कवेत घेतले. या दुर्घटनेत संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले असून, या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत आमदार कैलास पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. दुर्घटनेची पाहणी करून बचावकार्य आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना दिल्या. गावकरी, पोलीस प्रशासन आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

या दुर्घटनेतील सर्वाधिक काळीज पिळवटून टाकणारी बाब म्हणजे आपल्या मुलींचा जीव वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या पित्यालाही आपले प्राण गमवावे लागले. मुलींना वाचवण्यासाठी एका बापाने केलेला शेवटचा संघर्ष आठवला तरी मन सुन्न होते. काळाने एका क्षणात हसते-खेळते कुटुंब हिरावून घेतले. एका तरुणाचा जीव वाचवण्यात यश आले असले तरी सहा निष्पाप जीवांना वाचवता आले नाही, ही अत्यंत वेदनादायी बाब असल्याची भावना आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केली.

या भीषण दुर्घटनेत उत्तम त्रिंबक करंडे, चंद्रकला उत्तम करंडे, गोविंद उत्तम करंडे, ज्योती गोविंद करंडे, गायत्री गोविंद करंडे आणि सिद्धी गोविंद करंडे या सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील सहा जणांचा असा अंत होणे ही कधीही भरून न निघणारी हानी आहे.

या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्वांना आमदार कैलास पाटील यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तसेच या असह्य दुःखातून सावरण्याचे बळ त्यांच्या आप्तस्वकीयांना मिळो आणि मृतात्म्यांना शांती लाभो, अशी प्रार्थना केली.

<nis:link nis:type=tag nis:id=येडशी nis:value=येडशी nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=धाराशिव nis:value=धाराशिव nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=कैलासपाटील nis:value=कैलासपाटील nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=येडशीआगदुर्घटना nis:value=येडशीआगदुर्घटना nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=अग्नितांडव nis:value=अग्नितांडव nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=करंडेकुटुंब nis:value=करंडेकुटुंब nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=dharashiv nis:value=Dharashiv nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=osmanabadnews nis:value=OsmanabadNews nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=osmanabadnews nis:value=OsmanabadNews nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=धाराशिवन्यूज nis:value=धाराशिवन्यूज nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=उस्मानाबादन्यूज nis:value=उस्मानाबादन्यूज nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=अंतरसंवादन्यूज nis:value=अंतरसंवादन्यूज nis:enabled=true nis:link/>
येडशी अग्निदुर्घटनास्थळी आ. डॉ. प्रतापसिंह पाटील यांची भेट; पीडित कुटुंबाला तातडीच्या मदतीची मागणी

धाराशिव, प्रतिनिधी : तालुक्यातील येडशी येथील करंडे गिफ्ट सेंटर व किराणा दुकानाला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी दुर्घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधितांकडून घटनेची माहिती घेत पीडित कुटुंबाला शासनाकडून तातडीने आर्थिक मदत व पुनर्वसनासाठी सहकार्य मिळावे, अशी मागणी केली.

मध्यरात्री सुमारे दोन ते अडीच वाजण्याच्या दरम्यान लागलेल्या आगीत दुकान व घर जळून खाक झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. घरातील सात जणांपैकी केवळ २० वर्षीय तरुणाचा जीव वाचला. मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात वडिलांनाही प्राण गमवावे लागल्याचे समजल्याने डॉ. पाटील यांनी तीव्र दुःख व्यक्त केले.

“ही दुर्घटना अत्यंत हृदयद्रावक असून, एका कुटुंबावर कोसळलेले संकट शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे. घटनेची सखोल चौकशी करून पीडित कुटुंबाला तातडीने मदत मिळावी,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना डॉ. पाटील यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. पीडित कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असून, आवश्यक मदतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
येडशीतील भीषण आगीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू; खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घटनास्थळी दिली भेट

धाराशिव : धाराशिव तालुक्यातील येडशी येथे मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. येथील करंडे गिफ्ट सेंटर व करंडे किराणा दुकानाला मध्यरात्री सुमारे २ ते २:३० वाजण्याच्या दरम्यान आग लागली. या आगीत दुकानासह वरील घरही जळून खाक झाले. या घटनेमुळे येडशी परिसरावर शोककळा पसरली आहे.

या घरातील सात जणांपैकी केवळ २० वर्षीय तरुणाचा जीव वाचला. विशेष म्हणजे, आगीतून मुलाचा जीव वाचविण्याच्या प्रयत्नात वडिलांनी स्वतःचे प्राण गमावल्याची घटना अत्यंत वेदनादायी ठरली आहे. मुलाच्या रक्षणासाठी एका पित्याने केलेला अखेरचा संघर्ष मन हेलावून टाकणारा असल्याची भावना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केली.

घटनेची माहिती मिळताच खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आज दुर्घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधितांकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली. एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करणारी ही दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी असल्याचे त्यांनी म्हटले.

या आगीच्या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच पीडित कुटुंबाला शासनाच्या वतीने तातडीने आवश्यक आर्थिक मदत देण्यात यावी. याशिवाय उर्वरित कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी शासनाने आवश्यक ते सहकार्य करावे, अशी अपेक्षाही खासदार ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केली.

या भीषण दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्व सहा जणांना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तसेच या दुःखद प्रसंगी पीडित कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली.
*येडशीतील अग्नितांडवाने सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू;*

 करंडे कुटुंबावर कोसळलेला दुःखाचा डोंगर मन हेलावणारा! , मृतांच्या वारसांना शासनाकडून योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने प्रस्ताव पाठवावा;

 बचावलेल्यांना मानसिक आधार देण्याचे निर्देश — पालकमंत्री प्रताप सरनाईक

धाराशिव, दि. ९ नोव्हेंबर २०२६ : धाराशिव जिल्ह्यातील येडशी गावात आज मध्यरात्री करंडे कुटुंबीयांच्या घराला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अत्यंत हृदयद्रावक आणि मन सुन्न करणारी आहे. दिवाळीसारख्या आनंदाच्या, मांगल्याच्या आणि प्रकाशाच्या सणात एका कुटुंबावर काळाने असा घाला घालावा, ही बाब अतिशय वेदनादायी आहे. ज्या घरात सणाचा आनंद आणि उत्साह असायला हवा होता, त्या घरात आज दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने संपूर्ण धाराशिव जिल्हा शोकसागरात बुडाला असून, या दुःखद प्रसंगात कारंडे कुटुंबीयांच्या दुःखात मी मनापासून सहभागी आहे, अशा शब्दांत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आपल्या तीव्र शोकभावना व्यक्त केल्या.

या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्व सहा जणांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबीयांप्रती सरनाईक यांनी मनःपूर्वक संवेदना व्यक्त केल्या. कोणत्याही कुटुंबासाठी आपल्या प्रियजनांना अशा प्रकारे गमावणे ही कधीही भरून न निघणारी हानी आहे. या कुटुंबावर ओढवलेल्या दुःखाची तीव्रता शब्दांत व्यक्त करणेही कठीण आहे. या कठीण प्रसंगी शासन आणि जिल्हा प्रशासन पीडित कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

या घटनेची सखोल चौकशी करून आगीचे नेमके कारण शोधण्यात यावे. तसेच मृत व्यक्तींच्या वारसांना शासनाच्या माध्यमातून आर्थिक व इतर आवश्यक मदत मिळावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने आवश्यक प्रस्ताव शासनाकडे सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री सरनाईक यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

या दुर्घटनेतून जे कुटुंबीय बचावले आहेत, त्यांच्यावरही मोठा मानसिक आघात झाला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ आर्थिक मदत देऊन प्रशासनाची जबाबदारी संपत नाही. त्यांना योग्य समुपदेशन, मानसिक आधार आणि आवश्यक वैद्यकीय मदत उपलब्ध करून देणे तितकेच महत्त्वाचे आहे. या दुःखद प्रसंगातून सावरण्यासाठी प्रशासनाने त्यांना सर्वतोपरी सहकार्य करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

एका निष्पाप कुटुंबाचा संसार आगीच्या भक्ष्यस्थानी पडून सहा जीवांचा अंत होणे ही केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नसून संपूर्ण समाजाला हादरवून सोडणारी घटना आहे. अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी घरगुती वीजजोडण्या, अग्निसुरक्षा आणि आपत्कालीन बचाव व्यवस्थेबाबत आवश्यक ती दक्षता घेण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

या दुःखाच्या काळात करंडे कुटुंबीयांना धीर मिळावा, त्यांना या आघातातून सावरण्याचे बळ मिळावे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना असल्याचेही पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.
येडशीतील अग्नितांडवाने सहा जीव हिरावले; आ. राणा पाटील पहाटेच घटनास्थळी, बचावकार्यासाठी यंत्रणा युद्धपातळीवर सक्रिय

माहिती मिळताच पहाटे चार वाजता घटनास्थळी धाव; अग्निशमन दल, पोलीस आणि आरोग्य यंत्रणेला तातडीच्या सूचना, स्वतः थांबून बचावकार्यात सहभाग

धाराशिव : तालुक्यातील येडशी येथे सोमवारी पहाटेच्या सुमारास घडलेल्या भीषण अग्नितांडवात एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुकानाला लागलेली आग शेजारील घरात पसरल्याने ही हृदयद्रावक दुर्घटना घडली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी माहिती मिळताच पहाटे चार वाजता घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्याला गती देण्यासाठी त्यांनी स्वतः घटनास्थळी थांबून संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

पहाटे तीनच्या सुमारास करंडे किराणा स्टोअर्स अँड गिफ्ट वेअर या दुकानाला आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण करत दुकानाला लागून असलेल्या घरालाही वेढा घातला. घरात कुटुंबातील सदस्य अडकले असल्याची माहिती मिळताच आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून बचावकार्याची सूत्रे हलवली. तुळजापूर आणि कळंब येथून अग्निशमन दलाची वाहने मागविण्यासह कळंब, धाराशिव आणि तुळजापूर येथून रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.

गावकरी, पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच घरातील व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनीही घटनास्थळी उपस्थित राहून बचावकार्याचा आढावा घेतला आणि यंत्रणांमध्ये समन्वय साधत मदतकार्याला गती दिली. या प्रयत्नांमुळे एका व्यक्तीचे प्राण वाचविण्यात यश आले. मात्र, सर्वतोपरी प्रयत्न करूनही सहा जणांचे प्राण वाचवता आले नाहीत. ही बाब अत्यंत वेदनादायी असल्याची भावना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केली.

या दुर्घटनेत उत्तम त्रिंबक करंडे (७५), चंद्रकला उत्तम करंडे (७०), गोविंद उत्तम करंडे (४७), ज्योती गोविंद करंडे (४२), गायत्री गोविंद करंडे (१६) आणि सिद्धी गोविंद करंडे (१५) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. करंडे कुटुंबावर कोसळलेला दुःखाचा डोंगर शब्दांत व्यक्त करण्यापलीकडचा आहे. या दुर्घटनेतील मृतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या असह्य दुःखातून सावरण्याचे बळ त्यांच्या कुटुंबीयांना मिळो, अशी प्रार्थनाही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली.
*श्री तुळजाभवानी मंदिरात पारंपरिक भेंडोळी उत्सव उत्साहात संपन्न*

श्री क्षेत्र तुळजापूर येथे दीपावलीतील काळभैरवनाथांचा पारंपरिक भेंडोळी उत्सव रविवारी रात्री मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. काशी आणि तुळजापूर येथे साजरा होणाऱ्या या वैशिष्ट्यपूर्ण उत्सवाला प्राचीन धार्मिक परंपरेची पार्श्वभूमी लाभली आहे.

उत्सवानिमित्त श्री काळभैरव मंदिरासमोर पारंपरिक पद्धतीने भेंडोळीची बांधणी करून विधिवत पूजन व आरती करण्यात आली. त्यानंतर भेंडोळी प्रज्वलित करण्यात आली. शेकडो पुजारी बांधवांनी पेटती भेंडोळी खांद्यावर घेऊन श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिराकडे प्रस्थान केले. आगीच्या ज्वालासह एका छोट्याशा रस्त्यातून भेंडोळी घेऊन देवीच्या मंदिरात जाणं हा एक थरारक अनुभव असतो. यावेळी 'आई राजा उदो उदो' आणि 'भैरवनाथ चांगभलं' या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला.

रात्री साडेआठच्या सुमारास भेंडोळी मंदिरात दाखल झाली. यावेळी भेंडोळीची गाभाऱ्यात जाऊन प्रदक्षिणा झाली.
भेंडोळी मंदिराबाहेर पडताच अभिषेक घाट झाली. व सिंहासन व अभिषेकास प्रारंभ झाला. या वैशिष्ट्यपूर्ण धार्मिक सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

या वेळी तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) अरविंद बोळंगे, सहायक व्यवस्थापक (सामान्य) जयसिंग पाटील, सहायक व्यवस्थापक (प्रशासन) नागेश शितोळे, सहायक व्यवस्थापक (धार्मिक) अनुप ढमाले, रामेश्वर वाले, महंत तुकोजी बुवा, महंत चिलोजी बुवा, महंत हमरोजी बुवा, महंत वाकोजी बुवा, महंत मावजीनाथ महाराज, मंदिर संस्थानचे अधिकारी व कर्मचारी, पुजारी बांधव तसेच भाविक उपस्थित होते.

तत्पूर्वी नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजन निमित्त पहाटे श्री तुळजाभवानी मातेस सुगंधी उटणे लावून अभ्यंगस्नान, पंचामृत स्नान व श्रीदेवीजींची अभिषेक पूजा हे धार्मिक विधी पारंपरिक पद्धतीने संपन्न झाले.
लातूर : MIDC परिसरात अरोमा हॉटेलजवळील पटेल प्लास्टिक येथे आग लागल्याची घटना; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल...

विडियो सौजन्य - लव लातूर जीव लातुर
संकट मोठं असलं तरी जिद्द अन् एकजूट त्याहून मोठी! ,
चोराखळी,बारूळ येथे फराळासोबत घोंगडी बैठक; येडशीजवळ आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी

धाराशिव : जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असताना शेतकरी बांधवांना धीर देण्यासाठी आणि त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी चोराखळी व बारुळ येथे दिवाळी फराळासोबत घोंगडी बैठक घेतली. तसेच सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावरील येडशीजवळ आदिवासी बांधवांच्या पालावर जाऊन त्यांच्यासोबत दिवाळीचा आनंद साजरा केला.

घोंगडी बैठकीत शेतकरी,युवक,वडीलधारी मंडळी आणि तरुणांशी त्यांनी मनमोकळा संवाद साधला. दिवाळी फराळाचा आस्वाद घेताना शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी, अपेक्षा आणि प्रश्न मांडले. हा संवाद केवळ सणापुरता मर्यादित नसून संकटाच्या काळात शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा विश्वास देणारा असल्याचे पाटील यांनी सांगितले. दुष्काळावर मात करण्यासाठी आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या जिल्ह्यात अनेक ठोस प्रयत्न सुरू आहेत. उजनीतून धाराशिवसाठी एक टीएमसी पाणी उपलब्ध होत आहे. गावागावांत नोडल अधिकारी नियुक्त केले असून चारा लागवड आणि गाळपेर क्षेत्रातील शेतीला चालना देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या संकटात शेतकरी बांधवांनी खचून जाऊ नये. त्यांच्या सुख-दुःखात आणि संघर्षात आपण खंबीरपणे सोबत आहोत, अशी ग्वाहीही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी दिली.

दरम्यान, येडशीजवळील आदिवासी बांधवांच्या पालावर भेट देऊन आमदार पाटील यांनी चिमुकल्या मुलांसह कष्टकरी कुटुंबीयांबरोबर दिवाळी फराळाचा आनंद घेतला. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि आपुलकीतून दिवाळीचा खरा आनंद अनुभवायला मिळाला, असे त्यांनी सांगितले. दिवाळीचा खरा आनंद केवळ रोषणाईत नसून माणसांच्या चेहऱ्यावरील समाधानात आणि परस्परांच्या सुख-दुःखात सहभागी होण्यात आहे, अशी भावना व्यक्त करत या जिल्ह्यातील सर्व सहकारी बांधवांनी अशाच उपक्रमांतून सामाजिक बांधिलकी जोपासावी असे आवाहनही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे. 

यावेळी चोराखळी येथे विकास बारकुल,गणेश बारकुल, खंडेराव मैदाड,पोपट जेवे,शिवाजी बाराते,रामकिसन कोकाटे,मदन बारकुल ,स्वप्निल दिवाने,रणजित दिवाने विश्वंभर मैंदाड,बाबू भाई उपस्थित होते.

बारुळ येथे 
सिध्देश्वर कोरे,विक्रम देशमुख ,संतोष बोबडे, दयानंद शिंदे,वैभव मरडे,किसन देडे,भिवाजी इंगोले,प्रभाकर मुळे,अनिल बंडगर,प्रशांत लोमटे,बाबुराव ठोंबरे, शहाजी सुपनार, नबीलाल शेख, संजय ठोंबरे, सुधीर सुपनर, पंकज धनवडे, भास्कर सगट, रतन मुदगुडे, बाबुराव यावलकर, बाबुराव टोम्पे, अशोक देवगुंडे, पद्मराज गडदे, दामाजी राठोड, कल्याण बिराजदार उपस्थित होते 

येडशी येथे संजय लोखंडे,विजय सस्ते,डॉ,प्रशांत पवार,शशांक सस्ते,जयंत भोसले,सुनील शेळके उपस्थित होते.
विवेकानंद पाटील यांचा कर्जत (भीमाशंकर) मधून धडाकेबाज भाषण
आदिवासी बांधवांच्या पालावर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची दिवाळी; चिमुकल्यांसोबत साजरा केला आनंदोत्सव

धाराशिव : दिवाळीचा खरा आनंद केवळ झगमगाटात नसून तो माणसांच्या चेहऱ्यावरील समाधानात आहे, हा संदेश देत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी येडशीजवळील आदिवासी बांधवांच्या पालावर जाऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली.

सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावर येडशी परिसरात वास्तव्यास असलेल्या आदिवासी बांधवांच्या पालावर आमदार पाटील यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी आदिवासी कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांच्या सुख-दुःखाची विचारपूस केली. लहान मुलांसोबत वेळ घालवत त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद अनुभवला. तसेच सर्वांसोबत दिवाळीचा फराळ करत सणाचा आनंद वाटून घेतला.

या भेटीदरम्यान कष्टकरी बांधवांची आपुलकी, चिमुकल्यांचे निरागस हास्य आणि सर्वांसोबत झालेल्या मनमोकळ्या गप्पांमुळे दिवाळीचा आनंद द्विगुणित झाल्याची भावना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सोशल मीडियावरील पोस्टमधून व्यक्त केली.

दिवाळीच्या सणानिमित्त समाजातील विविध घटकांसोबत आनंदाचे क्षण साजरे करण्याचा संदेश या भेटीतून त्यांनी दिला.

<nis:link nis:type=tag nis:id=राणाजगजितसिंहपाटील nis:value=राणाजगजितसिंहपाटील nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=आदिवासीबांधव nis:value=आदिवासीबांधव nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=येडशी nis:value=येडशी nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=दिवाळी nis:value=दिवाळी nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=दिवाळीआनंदोत्सव nis:value=दिवाळीआनंदोत्सव nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=माणुसकीचीदिवाळी nis:value=माणुसकीचीदिवाळी nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=सेवाभाव nis:value=सेवाभाव nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=धाराशिव nis:value=धाराशिव nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=उस्मानाबाद nis:value=उस्मानाबाद nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=धाराशिवन्यूज nis:value=धाराशिवन्यूज nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=उस्मानाबादन्यूज nis:value=उस्मानाबादन्यूज nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=osmanabadnews nis:value=OsmanabadNews nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=dharashiv nis:value=Dharashiv nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ranajagjitsinhapatil nis:value=RanajagjitsinhaPatil nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=osmanabadnews nis:value=OsmanabadNews nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=antarsanwadnews nis:value=AntarsanwadNews nis:enabled=true nis:link/>
फळबागा साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाचा निर्णय