तिरोडा: धादरी येथे भव्य एक दिवशीय रात्र कालीन कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन संपन्न
Tirora, Gondia | Dec 13, 2025 तिरोडा तालुक्यातील ग्राम धादरी येथे विर एकलव्य क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य एक दिवशीय रात्रकालीन कबड्डी स्पर्धेला दिनांक १३ डिसेंबर रोजी उत्साहाचे वलय प्राप्त झाले. या स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्मठ व कार्यतत्पर तालुकाध्यक्ष, तसेच जनतेचे लाडके जिल्हा परिषद सदस्य, श्री.जगदीश(बालू) बावनथडे यांच्या सशक्त हस्ते मोठ्या थाटात संपन्न झाले.