आज दिनांक २५ ऑगस्ट २०२६ रोजी मा.पोलीस आयुक्त, मा.पोलीस उपायुक्त गुन्हे, मा.सहायक पोलीस आयुक्त गुन्हे व मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक सायबर पोलीस स्टेशन, सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रिं. के. पी. मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, करिअर डेव्हलपमेंट अँड रिसर्च, सोलापूर येथे MBA व BCA विभागाच्या विद्यार्थ्यांना सायबर क्राईम अवेअरनेस बाबत पोलीस उपनिरीक्षक श्री. प्रवीण भोपळे, सायबर सिक्युरिटी तज्ञ श्री.अविनाश पाटील, महिला पोलीस अंमलदार प्रांजली काळे, पो.कॉ.सचिन अंबलगी महिला सुरक्षा, सोशल मीडिया जबाबदारीने वापर, सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारे गुन्हे तसेच सायबर गुन्ह्यांपासून घ्यावयाची काळजी याबाबत प्रात्यक्षिकासह सखोल मार्गदर्शन केल. विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील विविध आव्हानांची माहिती मिळावी तसेच सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर सायबर जनजागृती कार्यशाळेस संस्थेचे चेअरमन श्री. सुरेश मानकानी, डायरेक्टर डॉ. O M. अस्तनकर, संगणक शास्त्र विभाग प्रमुख श्री. संतोष कुलकर्णी सर तसेच महाविद्यालयातील कौन्सिलिंग कमिटीचे प्राध्यापक श्रीमती सविता वैद्य, प्राध्यापक संतोष कुलकर्णी, प्राध्यापक श्रीमती स्नेहल पाठक, प्राध्यापक श्रीमती सुचिता भोगडे, प्राध्यापक श्रीमती प्रार्थना भक्षी, तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
39 views | Solapur, Maharashtra | Aug 25, 2026