आज दिनांक 8 सप्टेंबर २०२६ रोजी मा.पोलीस आयुक्त, मा.पोलीस उपायुक्त गुन्हे, मा.सहायक पोलीस आयुक्त गुन्हे व मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक सायबर पोलीस स्टेशन, सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सिद्धेश्वर वुमन्स इंजिनिअरिंग महाविद्यालय सोलापूर येथे अभियांत्रिकी विभागातील तब्बल 390+ विद्यार्थिनींना आयोजित सायबर क्राईम अवेअरनेस कार्यशाळेत सायबर सिक्युरिटी तज्ञ श्री.अविनाश पाटील, महिला पोलीस अंमलदार प्रांजली काळे, पो.कॉ.सचिन अंबलगी यांनी सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर, सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारे गुन्हे तसेच सायबर गुन्ह्यांपासून घ्यावयाची काळजी याबाबत प्रात्यक्षिकासह सखोल मार्गदर्शन केल. आपला मोबाईल सायलेंटवर असताना देखील हॅकर्स कशाप्रकारे आपल्या मोबाईलचा कॅमेरातून व माइक चा वापर करून अप्रत्यक्षरीत्या मोबाईलचा ताबा मिळू शकतात याची प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. तसेच KYC Scam, OTP Fraud, Digital Arrest, Remote Access, फेक कॉल्स, फिशिंग लिंक व ऑनलाइन बँकिंग फसवणुकीच्या विविध पद्धतींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
विशेष म्हणजे, केवळ पुस्तकी माहिती न देता मोबाईल डिव्हाइसवर प्रत्यक्ष Live Demonstration करून, सायबर हल्ल्यांमध्ये गुन्हेगार कोणत्या प्रकारे एखाद्या मोबाईलचा अनधिकृत प्रवेश मिळवू शकतात आणि OTP अथवा पारंपरिक Credentials शिवायही काही परिस्थितींमध्ये डिव्हाइस/डेटावर धोका कसा निर्माण होऊ शकतो, याचे प्रात्यक्षिक उपस्थितांना दाखविण्यात आले. सदर
कार्यशाळेस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर टी. ए. चव्हाण तसेच अभियांत्रिकी विभागाचे HOD'S व प्राध्यापक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
57 views | Solapur, Maharashtra | Sep 9, 2026