🚨 सायबर फ्रॉडपासून सावध राहा! | नागपूर शहर पोलीस 🔐
🏠 घरबसल्या दररोज हजारो रुपये कमवा! अशा आकर्षक जाहिराती आणि मेसेजच्या आमिषाला बळी पडू नका.
सोशल मीडियावरून मिळणाऱ्या अशा ऑफर्समध्ये सुरुवातीला काही पैसे देऊन विश्वास संपादन केला जातो आणि नंतर सिक्युरिटी अमाउंट किंवा इतर कारणांसाठी मोठ्या रकमेची मागणी केली जाते. हे सायबर फसवणुकीचे जाळे असू शकते!
⚠️ लक्षात ठेवा:
▪️ अनोळखी लिंकवर क्लिक करू नका.
▪️ कोणत्याही अनोळखी व्यक्तीला पैसे पाठवण्यापूर्वी खात्री करा.
▪️ फेक वेबसाइट्स आणि आकर्षक कमाईच्या आमिषांपासून सावध राहा.
▪️ कोणतीही ऑफर स्वीकारण्यापूर्वी तिची सत्यता पडताळून पाहा.
👮♀️ मा. विनिता शाहू, अपर पोलीस आयुक्त यांच्या सायबर सुरक्षाविषयक मार्गदर्शनातून जागरूक राहा आणि सुरक्षित राहा!
📞 सायबर फसवणूक झाल्यास त्वरित 1930 वर कॉल करा किंवा cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा.
नागपूर शहर पोलीस — सतर्क राहा, सुरक्षित राहा! 🛡️
#NagpurCityPolice #CyberSafety #CyberFraud #StayAlert #CyberAwareness
32 views | Nagpur, Maharashtra | Oct 28, 2026