दक्षता जागरूकता सप्ताह | भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ 🇮🇳
दक्षता जागरूकता सप्ताहाच्या निमित्ताने नागपूर शहर पोलीस भवन येथे मा. पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांच्या उपस्थितीत अधिकारी व अंमलदार यांनी भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेतली.
या शपथेद्वारे भ्रष्टाचाराला प्रतिबंध करणे, प्रामाणिकपणा व पारदर्शकतेची मूल्ये जपणे, तसेच कर्तव्य बजावताना सचोटी, निष्ठा आणि जबाबदारीने कार्य करण्याचा संकल्प करण्यात आला.
भ्रष्टाचारमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि जनसेवेची बांधिलकी जपूया!
नागपूर शहर पोलीस
विश्वास • सुरक्षा • सेवा
#NagpurCityPolice #VigilanceAwarenessWeek #AntiCorruption #Integrity #CorruptionFreeIndia
39 views | Nagpur, Maharashtra | Oct 28, 2026