पालघर: उपलाट- तलासरी परिसरात जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक
तलासरीतील उपलाट परिसरात राष्ट्रीय महामार्गावर तिन्ही सर्वांनी सोन्याचे दागिने कार असा मुद्देमाल जबरी चोरी करून नेला. याप्रकरणी तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला स्थानिक गुन्हे शाखेने सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे या प्रकरणाचा तपास केला. त्यानंतर मंचर येथून पोलिसांनी विशाल तांदळे या आरोपीला अटक केली आहे. अटक आरोपीवर विविध पोलीस ठाण्यात 27 गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासत निष्पन्न झाले आहे.