पालघर: अवंतिका एक्सप्रेसमध्ये महिलेवर हल्ला करणाऱ्या दोन आरोपींना न्यायालयाने सुनावली चार दिवसांची पोलीस कोठडी
इंदोर येथे जाण्यासाठी अवंतिका एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या महिलेवर मारहाण करून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात शितल भोसले जखमी झाल्या. शितल भोसले यांच्या तक्रारीवरून पालघर रेल्वे पोलीस ठाण्यात दोन आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील दोनही आरोपींना पालघर रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. अटक आरोपींना पालघर कनिष्ठ स्तर न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.