पालघर: खालच्या जातीची असल्याने लग्नास नकार तरुणीने केली आत्महत्या; वसई- भास्करआळी परिसरातील घटना; गुन्हा दाखल
खालच्या जास्तीची असल्याने प्रियकराच्या वडिलाने लग्नास नकार दिल्याने नैराश्यातून तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वसई- भास्करआळी परिसरात घडली आहे रेवती निळे असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. वसई पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी प्रियकर आयुष राणा व त्याचे वडील अजय राणा या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.