फुलंब्री: जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषदेच्या संभाजीनगर उत्तर ग्रामीणच्या निवडणूक प्रमुख पदी आमदार चव्हाण यांची निवड
फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनुराधा चव्हाण यांची संभाजीनगर उत्तर ग्रामीणच्या जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपंचायतीच्या निवडणूक प्रमुख पदी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी निवड केली आहे. त्यामुळे पक्षाचे धोरण तळागाळापर्यंत पोहोचवणार असून पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणणार असल्याचे आमदार अनुराधा चव्हाण यांनी सांगितले.