कन्नड: गाडीला कट का मारला म्हणत उपळा येथे तरुणाची हॉकी स्टिक घेऊन शिवीगाळ,सीसीटीव्ही समोर
आज दि २५ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता माहिती मिळाली कि कन्नड तालुक्यातील उपळा येथे “गाडीला कट का मारला?” या कारणावरून एका तरुणाला हॉकी स्टिक घेऊन शिवीगाळ व दमदाटी केल्याची घटना घडली.ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.सदर प्रकारामुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.