कन्नड तालुक्यातील भरतसिंह राजपूत यांचा एक भावनिक व्हिडिओ आज दि २० फेब्रुवारी रोजी सांयवाजे पासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.सत्तेबाहेर राहूनही तालुक्यासाठी झटत राहिलो, महामारीसारख्या संकटातही लोकांच्या सुख-दुःखात सोबत उभा राहिलो, असे त्यांनी व्हिडिओत म्हटले आहे.लाडली बहिणी योजनेसह विविध निवडणुकांतील पराभवाचा उल्लेख करत त्यांनी कार्यकर्त्यांना आत्मचिंतनाचा संदेश दिला.या व्हिडिओमुळे तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण आले असून हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.