धुळे: पांजरा नदीपात्रात साडे चौदा हजार क्युसेस पाणी सोडल्याने नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा प्रशासनाकडून इशारा.
Dhule, Dhule | Aug 25, 2024 पांजरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे तसेच अक्कलपाडा प्रकल्पाच्या पाणभूत क्षेत्रात जोरदार पाऊस असल्याने तसेच वरील बाजूस असणाऱ्या पांजरा मालनगाव आणि जामखेडी प्रकल्पातून पाण्याचा या वाढत असल्याने अक्कलपाडा धरणामध्ये पाण्याच्या येवा मोठ्या प्रमाणात आहे. संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास साडे चौदा हजार क्युसेस विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.