धुळे: दसरा मैदान परिसरात विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह, परिसरात दुर्गंधी पसरल्याने उघडगीज आली घटना
Dhule, Dhule | Aug 25, 2024 धुळे शहरातील चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या दसेहरा मैदान परिसरातील गोशाळे जवळील विहिरीत तरुणाचा मृतदेह आढळून आलेला आहे, परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरल्यानंतर परिसरातील नागरिकांनी या विहिरीच्या दिशेने वास येत असल्याने पाहणी केली असता, त्या ठिकाणी पाण्यावर तरंगताना तरुणाचा मृतदेह नागरिकांना आढळून आला, त्यानंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली.