सायबर फसवणुकीतील रक्कम परत मिळवण्यासाठी MRM Portal वर Refund Request कशी कराल?
सायबर फसवणुकीनंतर NCRP तक्रारीतील परताव्यास पात्र रक्कम असल्यास, MRM Portal वर Raise Refund Request पर्यायाद्वारे परताव्यासाठी विनंती नोंदवता येते.
आपला 14 अंकी NCRP Acknowledgement Number टाका, OTP द्वारे पडताळणी करा आणि तक्रारीचा तपशील व Restorable Refund Amount काळजीपूर्वक तपासा. Refund Account चा योग्य IFSC Code भरा, PAN Card ची प्रत अपलोड करा आणि Declaration स्वीकारून Raise Request for Refund वर क्लिक करा. न्यायालयीन आदेश उपलब्ध असल्यासच Court Order पर्याय निवडून त्याची प्रत अपलोड करा.
विनंती यशस्वी झाल्यानंतर मिळणारा MRM Acknowledgement Number सुरक्षित जतन करा — पुढील कार्यवाही व विनंतीची स्थिती तपासण्यासाठी तो महत्त्वाचा आहे.
फसवणूक झाल्यानंतर तक्रारीसोबत योग्य परतावा प्रक्रिया पूर्ण करणेही महत्त्वाचे आहे.
सजग रहा • सुरक्षित रहा
— गडचिरोली पोलीस
#GadchiroliPolice #CyberAwareness #MRM #CyberFraud #CyberSafety NCRP MaharashtraPolice
@dgpmaharashtra @mahacyber @cmomaharashtra_ @mramesh_ips
176 views | Gadchiroli, Maharashtra | Oct 6, 2026