पालघर: भाजपमध्ये आलेल्या नेत्यांचे अगोदर पुनर्वसन करावे, त्यानंतर काँग्रेस संपवण्याची भाषा करावी;सुनिल भुसारा यांची टीका
काँग्रेस हे गवत असून ते कितीही उपटले तरी पुन्हा उभारी घेणार तसेच भाजपने गुंडांना सोबत घेऊन पक्ष वाढवण्यास सध्या सुरुवात केली असल्याचा घणाघात करत बावनकुळे यांच्या विधानाचा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते सुनिल भुसारा यांनी समाचार घेतला आहे. कुठलाही पक्ष संपत नसतो तो ध्येय धोरणांवर चालत असतो, त्यामुळे बावनकुळे यांनी भाजपमध्ये आलेल्या नेत्यांचा अगोदर पुनर्वसन कराव त्यानंतर काँग्रेस संपवण्याची भाषा करावी अशी टीका देखील यावेळी माजी आमदार सुनिल भुसारा यांनी केली आहे.