पालघर: नायगाव- ससुपाडा येथे आरएमसी प्लांटमधील विहिरीत पडून श्वास गुदमरल्याने दोन मजुरांचा मृत्यू
नायगाव पूर्व परिसरातील ससुपाडा येथे सिमेंटवर प्रक्रिया करणारे आरएमसी प्लांट असून या ठिकाणच्या 30 फूट खोल विहिरीत पडल्याने श्वास गुदमरून दोन मजुरांचा मृत्यू झाला आहे. त्यांना वाचवण्यासाठी विरहित उतरलेल्या तिसऱ्या मजुराला वाचवण्यात यश आले आहे. याप्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात भारतीय नागरी सुरक्षा संहितेच्या कलम 194 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहे.