पालघर: पालघर जिल्ह्याचा उच्च माध्यमिक म्हणजेच इयत्ता बारावीचा निकाल 92.19 टक्के
फेब्रुवारी, मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील 27470 मुले, 23217 मुली, असे एकूण 50687 विद्यार्थी इयत्ता बारावीच्या परीक्षेत बसले होते. त्यापैकी 24936 मुले , 21793 मुली असे एकूण 46729 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये 90.77% मुले व 93.86% मुली असा एकूण 92.19% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्ह्याचा इयत्ता बारावीचा निकाल 92.19% टक्के लागला आहे.