पालघर: आमदार विनोद निकोले यांच्या उपस्थितीत जामशेत, गोरवाडी, कामिडीपाडा येथे महावितरण, नागरिक यांची बैठक संपन्न
आमदार विनोद निकोले यांच्या प्रमुख उपस्थितीत जामखेड,गोरवाडी,कामिडीपाडा येथे महावितरणशी संबंधित समस्या संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत महावितरणचे अधिकारी, परिसरातील नागरिक उपस्थित होते. यावेळी महावितरणशी संबंधित समस्या नागरिकांनी मांडल्या. 40 नवीन मीटर त्वरित बसवण्यात येतील,दोन नवीन ट्रान्सफॉर्मर बसवणे, जीर्ण झालेले काम त्वरित बदलून देणे तसेच बंद केलेली लाईट सुरू करण्यात येईल व सात दिवसात कामे पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन महावितरण अधिकारी नागरिकांना दिले.