पालघर: आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या हस्ते माणिकपूर बस स्थानक येथे नवीन इलेक्ट्रिक बस सेवेचे उद्घाटन
वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या हस्ते माणिकपूर बस स्थानक येथे नवीन इलेक्ट्रिक बस सेवेचे उद्घाटन करण्यात आले. वसई पश्चिम ते किल्लाबंदर आणि वसई पश्चिम ते भुईगाव या मार्गावर नव्याने इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्यात आली असून आमदारांच्या हस्ते या इलेक्ट्रिक बस सेवेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी वसई विरार महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, वाहन व परिवहन घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त नानासाहेब कामठे, परिवहन विभाग सहाय्यक उपायुक्त विश्वनाथ तळेकर आदींसह मान्यवर उपस्थित होते.