पालघर: पालघर रेल्वे स्थानक परिसरात बर्निंग दुचाकीचा थरार; दुचाकीला लागली भीषण आग
पालघर रेल्वे स्थानक परिसरात बर्निंग दुचाकीचा थरार पहावयास मिळाला आहे. रेल्वे स्थानक परिसरात बाहेर उभ्या असलेल्या एका दुचाकीने अचानक पेट घेतला आणि काही क्षणातच दुचाकी केला भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले व फायर एस्टिंग्विशर मदतीने आग नियंत्रणात आणण्यात आली. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून दुचाकीला लागलेल्या आहेत संपूर्ण दुचाकी जळून खाक झाली आहे.