पालघर: पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ विरार-मनवेलपाडा येथे आंदोलन
जम्मू काश्मीरमधील पालकाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा जीव गेला आहे. या हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. विरार मनवेलपाडा येथे पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. दहशतवाद्यांना धडा शिकवून चोख प्रत्युत्तर देण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. श्रीमंतयोगी प्रतिष्ठानच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले, प्रतिष्ठांचे पदाधिकारी सदस्य नागरिक या आंदोलनात सहभागी झाले.