पालघर: विरार परिसरातील मनसे शाखांना मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्षांनी भेट देत बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांची साधला संवाद
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विरार परिसरातील शाखांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा विरार शहर संघटक विनोद मोरे यांनी भेट दिली. यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांनीसोबत बैठक घेत त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. आगामी पालिका निवडणुका, पक्ष बांधणी, संघटना बांधणी आदींचा विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.