पालघर: विरार येथे दहा हजारांची लाच मागितल्याप्रकरणी उत्पादन शुल्क विभाग दुय्यम निरीक्षक व खाजगी इसमाला अटक
तक्रारदाराचे बिअर शॉप असून दरमहा 2 हजार रुपये व करारनामा सही करण्याचे 1 हजार अशी 11 हजारांची लाच मागण्यात आली. तडजोडी अंती 10 हजार देण्याचे ठरले. तक्रारदाराने ठाणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. विरार येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात सापळा अर्ज 10 हजारांची लाच घेण्यासाठी दुय्यम निरीक्षकाच्या वतीने आलेल्या तणेश पाटील याला रंगेहात पकडले. दुय्यम निरीक्षक श्वेता नाईक तणेश पाटील या दोघांनाही अटक करण्यात आली असून विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.