हिंगणा: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वरिष्ठ नेते दिलीप पनकुले यांचे निधन
Hingna, Nagpur | Aug 20, 2026 20 ऑगस्टला दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, माँ वैष्णवी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि डिगडोह येथील शांती विद्या भवन हायस्कूल व ज्यूनियर कॉलेजचे संचालक दिलीप माणिकराव पनकुले वय ७५ यांचे २० ऑगस्ट रोजी त्यांच्या सुर्वेनगर, नागपूर येथील निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे.