कर्जत: पैश्याच्या वादातून एकाची गाडी खाली चिरडून हत्या.. आरोपी जेरबंद...
कर्जत तालुक्यातील राशीन येथे पैश्याच्या वादातून एकाचा खून झाल्याची घटना घडली आहे.सदर गुन्हयातील आरोपी तेजस काळे आणि चंद्रशेखर जाधव याच्यात पैश्याच्या कारणावरून वाद चालू होते. आरोपी तेजस काळे याने आपल्या स्वीफ्ट कारने चंद्रशेखर जाधव यांना बाईकवरून चालले असतांना धडक देत गंभीर जखमी केले. त्यातच जाधव यांचा मृत्यु झाला. या घटनेबाबत सुभाष जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयातील आरोपी तेजस काळे याला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे.