कल्याण पश्चिमेत ‘उडान’ उपक्रमांतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
कल्याण : रवि पाटील फाउंडेशनच्या वतीने ‘उडान’ या विशेष उपक्रमांतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन कल्याण पश्चिम येथे करण्यात आले. या कार्यक्रमाला कल्याण पश्चिम परिसरातील विविध इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील इयत्ता नववीचे सुमारे ४०० ते ५०० विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करत त्यांना प्रोत्साहन आणि पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मार्गदर्शन करण्यात आले. शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि गुणवंत विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे, हा ‘उडान’ उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना भविष्यातील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रोत्साहित
Kalyan, Thane | Aug 23, 2026