काम दर्जेदार करा, सरकारी काम वाटलं नाही पाहिजे!”; खासदार श्रीकांत शिंदेंचा ठेकेदारांना सज्जड दम
डोंबिवलीतील जनता दरबारात शेकडो नागरिकांच्या तक्रारींचे जागेवर निवारण
सावित्रीबाई फुले नाट्यगृह, सावळाराम महाराज क्रीडा संकुल, सुतिका गृह आणि सभागृह प्रकल्पांची पाहणी
“क्वालिटीच्या वस्तू वापरा, निकृष्ट काम खपवून घेतले जाणार नाही”; ठेकेदारांना स्पष्ट इशारा
विकासकामांच्या गुणवत्तेवर खासदारांची करडी नजर; अधिकाऱ्यांनाही दिल्या कडक सूचना
डोंबिवलीतील जोंधळे महाविद्यालयात आयोजित जनता दरबारात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नागरिकांच्या विविध समस्यांचा आढावा घेत थेट अधिकाऱ्यांना निर्देश दिले. यानंतर त्यांनी डोंबिवलीतील सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी कामांच्या गुणवत्तेबाबत नाराजी व्यक्त करत ठेकेदारांना चांगल्या दर्जाचे साहित्य वापरण्याचा सज्जड इशारा दिला. सावित्रीबाई फुले नाट्यगृह, संत सावळार�
Kalyan, Thane | Aug 23, 2026