मराठी अस्मितेवरून भाजपला रामराम; दुर्गेश बागुलांचा शिंदे गटात शेकडो पदाधिकाऱ्यांसह पक्षप्रवेश
- भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या राज ठाकरेवरील वक्तव्याचा दुर्गेश बागुलांकडून तीव्र विरोध
- “राज ठाकरेंवर टीका करा, मात्र परप्रांतीय नेत्यांचा आधार घेऊ नका” म्हणत बागुलांनी भाजप सदस्यत्वाचा दिला राजीनामा
- माजी आमदार गणपत गायकवाड यांचे निकटवर्तीय मानले जाणारे दुर्गेश बागुल आता शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर
- डोंबिवली पश्चिमेतील जोंधळे हॉलमध्ये खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार राजेश मोरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
- बागुलांसोबत शेकडो भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही शिवसेना शिंदे गटात केला प्रवेश
- कल्याण-डोंबिवलीच्या राजकारणात मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर भाजपला मोठा धक्का; पक्षांतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर
Kalyan, Thane | Aug 23, 2026