सावनेर: पाटण सावंगी येथे वानराचा मृत्यू, सेवेकरी मित्र परिवाराने केले अंत्यसंस्कार
Savner, Nagpur | Aug 10, 2026 पाटणसावंगी परिसरात एका वानराचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच सेवेकरी मित्र परिवाराने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृत वानरावर विधिवत अंत्यसंस्कार करून मानवतेचा आदर्श निर्माण केला. वानर मृतावस्थेत पडल्याची माहिती मिळाल्यानंतर सेवेकरी मित्र परिवाराच्या सदस्यांनी एकत्र येत मृत वानराचे अंत्यसंस्कार केले. मुक्या प्राण्यांप्रती संवेदनशीलता दाखवत करण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.